अनुपम खेरच्या मुलाचा साखरपुडा

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याचा साखरपुडा झाला आहे.

Updated: Jan 30, 2016, 10:09 PM IST
अनुपम खेरच्या मुलाचा साखरपुडा

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याचा साखरपुडा झाला आहे. सिंकदर आणि प्रिया सिंग या दोघांनी मुंबईमध्ये साखरपुडा केला. अनुपम खेर यांनी ट्विटरवर या दोघांच्या साखरपुड्याची माहिती दिली. 
या साखरपुड्याला सिकंदरचे आई वडिल किरण आणि अनुपम खेर, अनिल कपूर, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि पामेला चोपडा यांनी हजेरी लावली.

 

प्रिया सिंग ही अभिनेत्री सोनम कपूरची मावस बहिण आहे. प्रिया ही इंटिरियर डिझायनर कविता सिंग आणि उद्योगपती जसजीत सिंग यांची मुलगी आहे.