ब्रेकअपच्या चर्चांवर अरबाज खानचं सडेतोड उत्तर

२०१६ ची सुरुवात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी झाली. अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलाईका अरोरा यांच्या देखील ब्रेकअपच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Updated: Feb 2, 2016, 08:24 PM IST
ब्रेकअपच्या चर्चांवर अरबाज खानचं सडेतोड उत्तर title=

मुंबई : २०१६ ची सुरुवात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी झाली. अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलाईका अरोरा यांच्या देखील ब्रेकअपच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.

१७ वर्षापूर्वी अरबाज आणि मलाईका यांचं लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वीच मलाईका ही घर सोडून गेल्याची बातमी देखील रंगली होती. पण अरबाज खानने या सर्व चर्चांवर आता चुप्पी तोडली आहे असंच म्हणावे लागेल. 

अरबाज खानने इंस्टाग्रामवर एका डबस्मॉशच्या माध्यमातून रंगलेल्या चर्चांवर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने १९७० साली हिट झालेल्या राजेश खन्ना यांच्या गाण्याचा आधार घेतला आहे.

लोकांनी त्यांच्या कामाशी काम ठेवलं पाहिजे. त्यांनी काहीही लिहणं आणि बोलणं बंद करत त्यांच्या दु:खी जीवनावर लक्ष दिलं पाहिजे असंही म्हटलं आहे. 

पाहा व्हिडिओ

 

Some people need to mind their business, stop talking and writing bullshit and concentrate on their own miserable lives

A video posted by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on