अॅश-अभिसोबत सेटवर आराध्या!

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चनला बी-टाऊनची सर्वांत फेव्हरेट मॉम म्हटलं जात. अॅश जिथं कुठंही जाईल ती आपल्या छोट्या प्रिन्सेंस आराध्याला घेऊन जाते.

Updated: Jun 30, 2014, 03:12 PM IST
अॅश-अभिसोबत सेटवर आराध्या! title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चनला बी-टाऊनची सर्वांत फेव्हरेट मॉम म्हटलं जात. अॅश जिथं कुठंही जाईल ती आपल्या छोट्या प्रिन्सेंस आराध्याला घेऊन जाते.

 
अभिषेक आपल्या शुटिंगच्या शेड्यूलमध्ये बिझी असल्याकारणानं त्याला आराध्याला वेळ देता येवू शकत नाही, मात्र ऐश्वर्या पूर्णवेळ तिच्यासोबतच असते.
 
तिघांना एकत्र वेळ घालवणं खूप मुश्किल असते. पण जेव्हाही यांना एकत्र वेळ घालवण्याचा चान्स मिळतो ते सोडत नाहीत. मग ती शूटची वेळ असली तरी त्यांना चालते. अॅश-अभि जेव्हा शक्य होईल तेव्हा आराध्याला शुटिंगच्या सेटवरही घेऊन जातात. 

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा दोघं शूटमध्ये बिझी असतात तेव्हा आराध्या सेटवरच्या क्रू- मेंबरसोबत खेळण्यात व्यस्त असते. मात्र आराध्या खेळत असताना तिच्या आजूबाजूनं काळे पडदे लावले जातात, असं नाही की तिचे कोणी फोटो काढेल म्हणून पण तिच्या आई-वडिलांना वाटते की, तिच्या लाडक्या प्रिन्सेंसला खेळताना कोणी डिस्टर्ब करु नये. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.