असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार

बॉलीवूड अभिनेत्री असिन नव्या वर्षात २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकते. मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्माशी ती दिल्लीत विवाहबद्ध होते.

Updated: Dec 31, 2015, 11:21 AM IST
असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री असिन नव्या वर्षात २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकते. मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्माशी ती दिल्लीत विवाहबद्ध होते.

असिन आणि राहुल यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आलीये. क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या पत्रिका छापणाऱ्या ईडीसी डिझाईन्सनेच या पत्रिका बनवल्यात.

काही महत्त्वाच्या पाहुण्यांना निमंत्रण कार्ड पाठवण्यात येणार आहे. असिन आणि राहुल या दोघांनी मिळून या पत्रिकेची डिझाईन निवडली होती. दिल्लीमध्ये विवाहसोहळा पार पडणार असून यात मोजके पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुंबईतही मोठा सोहळा होईल यात बॉलीवूडच्या अनेक हस्ती उपस्थित राहतील.