बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.

Updated: Nov 3, 2016, 10:49 PM IST
बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

मुंबई : पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे. बच्चन कुटुंबियांनी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटामध्ये रणबीर आणि ऐश्वर्याच्या बोल्ड सीनमुळे बच्चन कुटुंबिय नाराज असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बच्चन कुटुंब हजेरी लावतील असं बोललं जात होतं. दिग्दर्शक करण जोहरनं यासाठी बच्चन कुटुंबियांना अनेकवेळा बोलावलं होतं, पण ते आले नाहीत.

सोशल नेटवर्किंगवर ऍक्टिव्ह असणाऱ्या बिग बींनीही ऐ दिल है मुश्किलबद्दल अवाक्षरही काढलं नाही. करण जोहर हा बॉलीवूडमधला एकच दिग्दर्शक आहे ज्यानं ऐश्वर्या, अमिताभ, जया आणि अभिषेक यांच्याबरोबर काम केलं आहे. पण ऐ दिल है मुश्किलमुळे मात्र करण जोहर आणि बच्चन कुटुंबियांचे संबंध ताणले गेल्याचा चर्चा आहेत.