'बाजीराव-मस्तानी'ने शाहरुखच्या 'दिलवाले'ची वाट लावली

येत्या शुक्रवारी दोन बिग बजेट सिनेमे आमने-सामने येणार आहेत.. शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन्सचा दिलवाले आणि संजय लिला भंसाळी यांचा बाजीराव मस्तानी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होतायेत.. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही सिनेमांमध्ये युद्ध रंगलंय. 

Updated: Dec 16, 2015, 03:20 PM IST
'बाजीराव-मस्तानी'ने शाहरुखच्या 'दिलवाले'ची वाट लावली title=

मुंबई : येत्या शुक्रवारी दोन बिग बजेट सिनेमे आमने-सामने येणार आहेत.. शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन्सचा दिलवाले आणि संजय लिला भंसाळी यांचा बाजीराव मस्तानी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होतायेत.. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही सिनेमांमध्ये युद्ध रंगलंय. 

मुंबईतल्या सिंगल स्क्रीनवर सध्या संजय लिला भंसाळी यांच्या बाजीराव मस्तानीचं वर्चस्व पहायला मिळतंय... ओव्हरऑल पाहता पंजाबमध्ये सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांची संख्या कमी असल्यामुळे, तिथे 'दिलवाले'च्या वाट्याला जास्त शोज आले आहेत.. तर दुसरीकडे दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये बाजीराव मस्तानीचं वर्चस्व दिसून येतंय.. 

विक्रमी मराठा मंदिरमध्येही एकही शो निश्चित नाही 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मराठा मंदिरमध्ये शाहरुख आणि काजोल स्टारर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमानं 1000 यशस्वी आठवडे पूर्ण केले, सध्यस्थिती पाहता त्याच मराठा मंदिरमध्ये 'दिलवाले' या सिनेमाच्या एकही शोबाबत अजून काहीही निश्चित झालेलं नाही..

असंच काहीसं चित्र 2007 सालीही पहायला मिळालं होतं, जेव्हा शाहरुखचा ओम शांती ओम आणि संजय लिला भंसाळी यांचा सावरिया हे दोन्हा सिनेमे आमने सामने आले होते.