'बजरंगी भाईजान' भारीच, दोन दिवसांत 64 कोटींची कमाई

मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'बाहुबली'ची कमाई पाहून 'बजरंगी भाईजान'चं काय होईल? याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमानच्या 'बजरंगी भाईजान'नं आतापर्यंत 64 कोटींची कमाई केलीय. 

Updated: Jul 19, 2015, 06:36 PM IST
'बजरंगी भाईजान' भारीच, दोन दिवसांत 64 कोटींची कमाई title=
Source - dnaindia

मुंबई: मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'बाहुबली'ची कमाई पाहून 'बजरंगी भाईजान'चं काय होईल? याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमानच्या 'बजरंगी भाईजान'नं आतापर्यंत 64 कोटींची कमाई केलीय. 

पहिल्या दिवशी 'बजरंगी भाईजान'नं 28 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी तब्बल 36.50 कोटी बजरंगीनं कमावले. एव्हढी कमाई करून सलमान खाननं त्याच्याच 'किक' चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलाय. 

'बाहुबली' आता 300च्या क्लबमध्ये पोहोचलाय. मात्र तरीही 'बजरंगी भाईजान' त्याला चांगलीच टक्कर देत आहे. 

बजरंगी टीमच्या मते भार्इंना कोणतंच टेन्शन नव्हतं, कारण शुक्रवारपासून हिंदी सिनेमात त्यांचीच चर्चा होणार, हे त्यांना माहित होतं. नेमकं तेच झालं. बाहुबलीच्या जागेवर आता बजरंगी भाईजानचा डंका वाजतोय.

बाहुबलीच्या यशामुळं ईदच्या पर्वावर सलमान खानचा बजरंगी भाईजानच्या यशावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात येत होतं. सलमानचा 'बजरंगी' बाहुबलीचा रथ रोखण्यात यशस्वी होणार काय, असा प्रश्न केला जात होता. मात्र सारे अंदाज चुकवत बजरंगी भाईजाननं सिनेमा बाजारात अशी धमाल केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.