मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' याने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा जादुई आकडा पार करत 'पीके'नंतर भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे.
कबीन खानने दिग्दर्शित, भारत-पाकिस्तानला केंद्रस्थानी घेऊ तयार करण्यात आलेला हा चित्रपट १७ जुलैला रिलीज झाला. एकूण २० दिवसात बजरंगी भाईजाने ३०० कोटींची कमाई केली आहे.
कबीर खानने ट्विटरवर याची माहिती देत ट्विट केले की, '३०० प्लस' इरॉस इंटरनॅशनलद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात बजरंगी भाईजानने ३०० कोटींचा आकडा पार केल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी आमीर खानच्या 'पीके' चित्रपटाने भारतात ३०० कोटींचा टप्पा पार केला होता.
या चित्रपटात बजरंग बलीचा भक्त पवनकुमार चतुर्वेदी (सलमान) एका मुक्या पाकिस्तानी मुलीला तिच्या गावात सुरक्षित पोहचवतो अशी या चित्रपटाची काहणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.