REVIEW : दोन पिढ्यांतील हरवलेला संवाद

 २०१६ ची सुरुवात झाली ती महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या सिनेमापासून, याच सिनेमानंतर अभिनेता महेश मांजरेकर यांचा या नवीन वर्षाचा हा दुसरा सिनेमा. 

Updated: Jan 29, 2016, 12:11 PM IST
REVIEW : दोन पिढ्यांतील हरवलेला संवाद title=

मुंबई :  २०१६ ची सुरुवात झाली ती महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या सिनेमापासून, याच सिनेमानंतर अभिनेता महेश मांजरेकर यांचा या नवीन वर्षाचा हा दुसरा सिनेमा. फरक एवढाच की त्यात ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते तर बंध नायलॉनचे या सिनेमात ते अभिनेता म्हणुन प्रमुख भूमिकेत दिसतायेत.. बंध नायलॉनचे ही गोष्ट आहे जोगळेकर कुटुंबाची. ही कथा आहे नव्या आणि जुन्या या दोन पिढींची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या नात्यांची. हल्ली जग खूप फास्ट झालंय. सगळं काही इस्टंट हवं असतं. टेक्नॉलॉजीच्या या फास्ट पेस्ड लाईफमध्ये नातीही बदलत चालली आहेत. या टेक्नॉलिजीचा प्रभाव नात्यांवरही होताना दिसतोय. अशाच नाते- संबंधांवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे बंध नायलॉनचे.

चित्रपटातील स्टारकास्ट

रघुनाथ जोगळेकर आणि मंगल जोगळेकर या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी. ही रिअल लाइफ पती-पत्नीची जोडी या सिनेमातही नवरा बायकोच्या कॅरेक्टरमध्ये पहायला मिळतायेत. अभिनेता सुबोध भावे ज्यानं या सिनेमात त्यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. देवदत्त जोगळेकर म्हणून तो या सिनेमात वावरतोय. 

कथा चित्रपटाची

देवदत्त जोगळेकर जो एक सक्सेसफुल बिजनेसमन आहे. काही मतभेदांमुळे आपल्या आई बाबांशी त्याचं अजिबात पटत नाही. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तो आपलं गाव सोडतो, आपल्या आई बाबांशी भांडून शहरात येतो. खूप पैसा कमवतो. आपल्या बायको आणि मुलीसोबत सुखी आयुष्य जगत असताना, त्याच्या मुलीला मात्र आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही. त्यांचं प्रेम तिला हवं असतं.. आजी आजोबांना घरी आणनं देवदत्तसाठी शक्य होत नाही, मग तो काय करतो? त्यांना घरी न आणता,  तो त्याच्या मुलीला आजी आजोबांचं प्रेम मिळवून देतो.. हे कसं काय शक्य होतं? हे रहस्य काय आहे? मराठी फिल्म इंडस्ट्रीत खरंतर कधीही न केलेला एक वेगळाच एक्सपेरिमेन्ट दिग्दर्शक जतीन वागळे यांनी यात केला आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहवा लागेल. इनशॉर्ट नव्या आणि जुन्या पिढींच्या विचारांचा संघर्ष यात मांडण्यात आलाय.

दिग्दर्शन, अभिनय आणि बरंच काही...

दिग्दर्शक जतिन वागळे बंध नायलॉनचे या सिनेमाला, सिनेमाच्या थीमप्रमाणेच उत्तम ट्रीटमेन्ट दिली आहे. अभिनेता महेश मांजरेकर आणि मेधा मांजर्कर या जोडीनं आपआपल्या भुमिका अगदी चोखपणे पार पाडल्या आहेत. विशेष करुन अभिनेता महेश मांजरेकर जे ब-याच दिवसांनी बिग स्क्रीनवर एक फुल फ्लेज्ड भूमिका करताना दिसतायेत. रघुनाथ बळवंत जोगळेर ही व्यक्तिरेखा खूपच सहजपणे त्यांनी साकारली आहे. त्यात त्यांच्या रीअल लाईफ पत्नी मेधा मांजरेकर यांची साथ म्हणजे सोने पे सुहागा. अभिनेता सुबोध भावेनं जवळ जवळ एक निगेटिव्ह भूमिका यात बजावली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक अत्यंत स्वार्थी आणि सतत पैशांमागे धावणा-या तरुणाच्या शेडमध्ये तो यात दिसतो. नेहमी प्रमाणे याही सिनेमात अभिनयाच्या बाबतीत सुबोधनं बाजी मारली आहे आणि त्याला अभिनेत्री श्रुती मराठेची उत्तम साथ मिळाली आहे. बाल कलाकार प्रांजल परब हिचा परफॉर्मन्सही छान झालाय. अभिनेता संजय नार्वेकर आणि सुनिल बर्वे या दोघांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत..

लेखक अंबर हडब आणि गणेश पंडित यांच्या बंध नायलॉनचे याच एकांकिकेवर आधारीत ही सिनेमा आहे. सिनेमाचा स्क्रीनप्ले आणि संवादही त्यांनीच लिहलेत. बंध नायलॉनचे हा एक संपूर्ण फॅमिली एंटरटेनर असून, दोन जनरेशनमधला हरवलेला संवाद या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा रिवाइव करता येईल.

स्टार्स
कलाकारांचे परफॉर्मन्स आणि सिनेमाची हाताळणी या सगळ्या गोष्टी पाहता मी बंध नायलॉनचे याया सिनेमाला मिळतायत ३.५ स्टार्स