बँग-बँगची कोटीच्या कोटी उड्डाणं

ऋत्विक-कटरीनाचा चित्रपट बँग-बँग ने मागील सहा दिवसात ११९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी त्या मानाने जास्त कमाई केली, मंगळवारी या चित्रपटाने १०.३१ कोटीची कमाई केली.  बँग-बँगने  अक्षय कुमारचा हॉलिडे आणि सलमान खानच्या जय हो चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, बँग-बँग २०१४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.

Updated: Oct 8, 2014, 11:19 PM IST
बँग-बँगची कोटीच्या कोटी उड्डाणं title=

मुंबई : ऋत्विक-कटरीनाचा चित्रपट बँग-बँग ने मागील सहा दिवसात ११९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी त्या मानाने जास्त कमाई केली, मंगळवारी या चित्रपटाने १०.३१ कोटीची कमाई केली.  बँग-बँगने  अक्षय कुमारचा हॉलिडे आणि सलमान खानच्या जय हो चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे, बँग-बँग २०१४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.

याआधी १०० कोटीच्या क्लबमध्ये सर्वात वेगात प्रवेश करणारा बँग-बँग हा पाचवा चित्रपट ठरला आहे.बँग-बँगच्या यशानंतर ऋत्विक रोशनच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

जर २०१४ चा विचार केला तर सलमानचा किक आणि अजय देवगनचा चित्रपट सिंघम रिटर्न्स चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कायम होते. सलमानच्या किकने ५ दिवसात १०० कोटीची कमाई केली होती आणि चित्रपटाने १२६ कोटी कमावले होते.

अजय देवगनच्या सिंघम रिटर्न्सनेही १०० कोटी रूपयांची कमाई केली आणि पाचव्या दिवशी हा चित्रपट १०० कोटीच्या क्लबमध्ये पोहोचला. मात्र आता बँग-बँगच्या कमाईनंतर सिंघम रिटर्न्स सहाव्या नंबरवर आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.