मुंबई : मराठी अभिनेता रितेश देशमुख याला पोलिसांनी अटक करुन त्याला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या रितेशचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
रितेशला कोणत्या आरोपाखाली अटक झाली आहे, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. मात्र, रितेशने तसे काहीही केलेले नाही. मग पोलिसांनी त्याला का अटक केली, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना?
फोटोत दिसणारा रितेशच आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत अभिनेता विवेक ओबेरायही आहे. मात्र, रितेशला झालेली अटक ही सत्य स्वरुपातील नाही.
रितेशचा आगामी सिनेमा 'बँक चोर' येत आहे. या सिनेमाचे प्रमोशन तो करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं एक पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमा प्रमोशनसाठी त्याला ही अटक झालेली आहे. गुन्हेगाराला अटक करतात त्याचप्रमाणे रितेशला पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत.
यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'बँक चोर' यात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. रितेश या सिनेमात एका मराठी तरुणाच्या भूमिकेत आहे. बँकेचे कर्ज न फेडू शकल्याने मित्रांच्या मदतीने बँक लुटण्याची योजना तो बनवतो आणि त्यात तो फसतो. त्याला पोलीस अटक करतात.
या सिनेमात विवेक ओबेरॉय सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 16 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. रितेश देशमुखच्या 2016 मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’ , ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि बॅन्जो या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
Here's the secret behind Bankchor's ground breaking technology for a 16D, #AR, #VR theatrical release #BankChorOn16June @y_films pic.twitter.com/u0lFZ9ALFV
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 1, 2017