आर्य बब्बरचा खरा चेहरा सर्वांसमोर आला!

बिग बॉसच्या घरात तर सर्वजण चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरतात. पण, या वीकेंडला एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला तो म्हणजे आर्य बब्बर...

Updated: Oct 13, 2014, 09:15 PM IST
आर्य बब्बरचा खरा चेहरा सर्वांसमोर आला! title=

मुंबई: बिग बॉसच्या घरात तर सर्वजण चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरतात. पण, या वीकेंडला एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला तो म्हणजे आर्य बब्बर...

काही दिवसांपूर्वी मिनिषानं दीपशिखाशी बोलताना सांगितलं की, आर्यनं मला म्हणाला आपण दोघे रोमांस करू, त्यामुळं बिग बॉसमध्ये खूप फुटेज मिळेल. सलमाननं मिनिषाला याबद्दल  विचारलं असता. हो, आर्य मला असं बोलला होता, की आपण हातात हात घेत आणि हग केल्यानंतर तुला कंफर्टेबल वाटेल का? पण, मी हे सर्व करण्यास नकार दिल्याचं मिनिषानं सांगितलं. कारण असं केल्यानं माझ्या लव लाइफवर त्याचा वाईट परिणाम होईल.

आर्यनं याबाबत खुलासा केला की, 'मिनिषा आणि मी एकत्र एक सिनेमात काम केलं असून ती माझी गर्लफ्रेंड होती. आम्ही दोघेजण ऐकमेंकाच्या सहमतीनं वेगळे झालो आहोत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास वाटत नसेल तर तुम्ही माझे मिनिषाचे फोन कॉल्स आणि मॅसेज  पाहू शकता', तेव्हा तुम्हाला कळेल. हा सर्वप्रकार सुरू असताना सलमाननं आर्यला खूप  थांबविण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. सलमाननं यावर खंत व्यक्त केली. मला  वाटलं देखील नव्हतं की, ही गोष्ट ऐवढी पुढं जाऊ शकते. सलमान आर्यला म्हटल की, मी देखील अशा परिस्थितीतून गेलो आहे.

जेव्हा मिनिषाला प्रश्न विचाला की, 'आर्य हा तुझा बायफ्रेंड होता का?' या प्रश्वनावर तिनं उत्तर देण्यास टाळा-टाळ केली. सलमाननं आर्य बब्बरला कन्फेशन रूममध्ये बोलवून त्याच्याशी गप्पा मारल्या. तेव्हा त्याला सांगितलं की, तू आर्य बब्बर बनून राहा. या शोमध्ये तू इन्जॉय कर आणि गेम खेळ कोणाचा  खूप मोठा भाऊ, वडील किंवा आजोबा होण्याचा प्रयत्न करू नकोस.

पुढील काळात आर्य बब्बर हा अपशब्द बोलताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. त्यानं त्याचा माइक देखील पाण्यात फेकून दिला आहे 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.