अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या स्वप्नात चक्क बोल्ड हिरोईन

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू  ही बोल्ड अभिनेत्री चक्क आघाडीवर असणाऱ्या प्रियंका चोप्रा हिच्या स्वप्नात येत आहे.  बिपाशाचा आगामी 'अलोन' या सिनेमाने प्रियंकाला भूरळ घातली आहे.

Updated: Dec 13, 2014, 08:27 PM IST
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या स्वप्नात चक्क बोल्ड हिरोईन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू  ही बोल्ड अभिनेत्री चक्क आघाडीवर असणाऱ्या प्रियंका चोप्रा हिच्या स्वप्नात येत आहे.  बिपाशाचा आगामी 'अलोन' या सिनेमाने प्रियंकाला भूरळ घातली आहे.

बिपाशाचा हॉरर चित्रपट 'अलोन' येत आहे. या सिनेमाने प्रियंका खूप प्रभावित झाली आहे. बिपाशाचा हा हॉरर सिनेमा मला पाहायला आवडेल, असं खुद्द प्रियंकाने म्हटलंय.

प्रियंकाने ट्विट केलंय, इतकी सुंदर बिपाशा कधी कोणाच्या स्वप्नात येऊन घाबरवण्याचे प्रयत्न करेल, असं कधीही वाटलं नव्हते. याच कारणामुळे मी तिचा सिनेमा पाहाण्यासाठी जाणार आहे.

प्रियंका सध्या तरी ट्विटरवरुन या सिनेमाचे एकप्रकारे प्रमोशन करताना दिसत आहे. तिची बहीण मनारा हिच्या चित्रपटाचेही तिने ट्विटरवरून प्रमोशन केले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.