रुस्तमच्या त्या दोन शब्दांना सेन्सॉरची कात्री

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Updated: Aug 11, 2016, 11:41 AM IST
रुस्तमच्या त्या दोन शब्दांना सेन्सॉरची कात्री title=

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे. पण या चित्रपटामधले दोन शब्दांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतले आहेत. हे दोन शब्द हटवण्याचा सूचना सेन्सॉर बोर्डानं दिल्या आहेत. 

रुस्तममध्ये अक्षय कुमारच्या सीनमध्ये बीच आणि बास्टर्ड हे दोन शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द काढून टाकायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं आहे. सेन्सॉर बोर्डानं याआधीच रुस्तमला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. 

अक्षय कुमारबरोबर एलिना डिक्रुझ आणि इशा गुप्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 12 तारखेला रुस्तमबरोबरच हृतिकचा 'मोहेनजोदारो'ही रिलीज होणार आहे.