मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक धक्कादायक उत्तर दिले आहे. तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी होती. त्यावर तिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने अजब उत्तर दिले. मुलं होण्यासाठी केवळ पुरुषांची गरज असते, असे म्हटले.
प्रियांकाने फिल्मफेअर मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या स्पष्ट वक्तेपणाचाही प्रत्यय घडवून दिला. तिच्या बोटात असलेल्या हिऱ्याच्या अंगठीबाबत कुतुहलानं विचारलं असता, 'माझे हिरे मी स्वत: खरेदी करते असं सांगत, माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल. ज्यावेळी मी कुणावर प्रेम करेन त्याचवेळी तो माझ्या आयुष्यात येईल आणि तो हिऱ्यांसाठी नाही तर मुलांसाठी असेल, असे बेधड उत्तर देत संताप व्यक्त केला.
त्याचवेळी प्रियांकाला सिंगल स्टेटस आवडने का, असे विचारले असता, मला मुलं आवडतात, त्यासाठी मी नक्की लग्न करेन असे तिने सांगितले. विवाहबाह्य संबंधातून मुलाला जन्म देणं ठिक नाही, असे ती म्हणाली.
प्रियांका चोप्राने तिच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्याचं टाळले. मला या गोष्टी बोलायला आवडत नाही. मी रिलेशनशिपमध्ये आहे की नाही हे दुसरं कोण कसं सांगणार, ते माझंच मला माहीत आहे असं सांगत तिने सांगत, आपल्या यात रस नसल्याचे ती म्हणाली.
कुठलीही रिलेशनशिप ब्रेक करणे सोपे नसते. असं सांगताना, आपण आपल्याला कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी हव्या आहेत ते बघावे, असे ती म्हणाली. मला पुस्तके हवीत, मला झोप हवी, मला चांगले मित्र हवेत, असे आपण करुन दुसऱ्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला.