`राधा’ला म्हटलं ‘सेक्सी’ शाहरूखवर खटला...

करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान निर्मित ‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या संपूर्ण टीमवर ‘राधा’साठी ‘सेक्सी’ शब्द वापरल्यामुळे मुंबई येथील एका व्यक्तीने खटला दाखल केला आहे. करण जोहरचा सध्याचा नवा चित्रपट‘स्टूडंट ऑफ द इअर’ चांगली कमाई करत आहे.

Updated: Nov 3, 2012, 02:07 PM IST

www.24taas.com,मुंबई
करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान निर्मित ‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या संपूर्ण टीमवर ‘राधा’साठी ‘सेक्सी’ शब्द वापरल्यामुळे मुंबई येथील एका व्यक्तीने खटला दाखल केला आहे. करण जोहरचा सध्याचा नवा चित्रपट‘स्टूडंट ऑफ द इअर’ चांगली कमाई करत आहे. या आठवड्यात कोणताच खास चित्रपट रिलिज न झाल्याने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ला चांगलाच फायदा झाला आहे. पण या चित्रपटाला मिळत असणारं यश कोणाच्या तरी नजरेत खूपलं आणि त्याने हा खटला दाखल केला आहे.
या चित्रपटाचे निर्माते शाहरूख आणि गौरी खान आहेत, या कारणामुळे चित्रपटावर खटला दाखल करण्यात आलाय. मुंबईतल्या मनीष विश्नोईने न्यायालयात यासंबंधीचा खटला दाखल केलाय.
या खटल्यात स्पष्ट तक्रार करण्यात आलीय की, चित्रपटाच्या एका गाण्यात ‘राधा’ला सेक्सी म्हटल्याने जनतेच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या कारणामुळे ‘स्टूडंट ऑफ द इअर’ च्या संपूर्ण टीमवर खटला दाखल करण्यात आलाय. चित्रपटाच्या टीमविरूद्ध २९५ अ, १२० अशी कलमं लावण्यात आलेली आहेत.