नवी दिल्ली : 'अतुल्य भारत' या केंद्राच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून आमीर खानला डच्चू देण्यात आल्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य करून आमीरनं वाद छेडला होता.
दरम्यान, पीआयबीच्या वेबसाइटवर पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. काही वृत्तपत्रात असे वृत्त आले की श्री. आमीर खान यांना अतुल्य भारत जाहिरातीतून काढून टाकण्यात आले आहे. पण मंत्रालयाने या संदर्भात कोणतीही भूमिका बदलली नाही. मंत्रालय यापूर्वी झालेल्या करारावर ठाम आहे. तसेच आमीर खान यांना कॅम्पनसाठी वापरण्यात येणार आहे.
आपली पत्नी किरणने देशात राहायची भीती वाटते असं म्हणाली होती असं आमीरनं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्याच्या या विधानानंतर देशात गदारोळ माजला होता.
अनेक ठिकाणी आमिरविरोधात निदर्शने करण्यात आली होती. आमिरचे पुतळेही जाळण्यात आले होते. 'अतुल्य भारत'चा ब्रँड अँबेसडर म्हणून झालेली आमीरची हकालपट्टी झाली असल्याचे वृ्त्त अनेक वाहिन्यांवर छळकत आहे.