'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम

2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

Updated: Dec 2, 2015, 08:41 PM IST
'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम title=

सियोल: 2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

कोरियन पॉप सिंगर पीएसवाई यानं गंगनम स्टाईल सारखं आणखी एक गाणं नुकतंच लॉन्च केलं आहे. हे गाणं लॉन्च होताच ते जबरदस्त व्हायरल झालं आहे. 

पीएसवाई डॅडी या गाण्याला पहिल्याच दिवशी 62 लाख लोकांनी पाहिलं. तर आतापर्यंत हे गाणं 1 करोड लोकांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचलं आहे. 

पीएसवाईचं हे नवं गाणं 3 ते 4 वर्षाच्या मेहनतीनंतर त्याने लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारचे डान्स स्टाईल्स दाखवले आहेत. 

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.