मुंबई : 'दीपिका जेवढी दाखवतेय, तेव्हढी ती काही मोठ्या मनाची नाही...' असं आमचं नाही तर अभिनेत्री कंगना राणावत हिचं म्हणणं आहे.
२०१४ साली 'क्वीन'सारखा हिट सिनेमा देऊन अभिनेत्री कंगना राणावत हिनं प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं मन जिंकलंय... तर दुसरीकडे 'हॅप्पी न्यू इअर'मध्ये झळकत दीपिकानंही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं... पण, त्यामानानं 'हॅप्पी न्यू इअर'नं जितका गल्ला गोळा केला तितका गल्ला गोळा करण्यात 'क्वीन' अपयशी ठरली.
सध्या, अनेक पुरस्कारांमध्ये प्रियांका चोपडा हिला 'बेस्ट अॅक्ट्रेस' म्हणून तर दीपिकाला 'बेस्ट पॉप्युलर अॅक्ट्रेस'चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय. अशाच एका कार्यक्रमात अॅवॉर्ड घ्यायला पोहचलेल्या दीपिकानं आपला अॅवॉर्ड अभिनेत्री कंगना राणावत हिला डेडिकेट केला. '२०१४ सालातील खरी क्वीन कंगनाच होती' असंही दीपिकानं यावेळी म्हटलं.
यावर, कंगनाची प्रतिक्रिया विचारली असता तिनं दीपिकाला चांगलंच फटकारलं. दीपिकाला आपल्या मनाचा मोठेपणा दाखवण्याची काही एक गरज नाही... तिला खरंच माझं काम आवडलं असतं तर मला फोन करूनही ती बोलू शकली असती. पण, तिनं असं काहीच केलं नाही, असं म्हणत कंगनानं हा दीपिकाचा दिखावूपणा असल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.