दीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा

बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन हिने एका अभिनेत्यासह काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा आमिर नाही. 

Updated: Apr 5, 2016, 08:32 PM IST
दीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन हिने एका अभिनेत्यासह काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा आमिर नाही. 

दीपिकाला सध्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांची ऑफर असू शकते. अनेक मोठे कलाकार देखील तिच्यासोबत काम करण्यास उत्सूक असू शकतील पण दीपिकाने सिद्धार्थ मल्होत्राचं नाव घेतल्याने बॉलिवूडमधील अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील.

दीपिकाला काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये आलेल्या सिद्धार्थ सोबत काम करायचंय. दीपिकाला असं वाटतं की दोघांची जोडी खूप चांगली दिसेल. सध्या सिद्धार्थ कॅटरिना कॅफ सोबत एक सिनेमा करतोय.