अखेर 'बाजीराव मस्तानी'तलं 'दीपिका-प्रियांका'चं पिंगा साँग रिलीज

प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

Updated: Nov 16, 2015, 03:31 PM IST
अखेर 'बाजीराव मस्तानी'तलं 'दीपिका-प्रियांका'चं पिंगा साँग रिलीज title=

मुंबई : प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग अभिनीत 'बाजीराव - मस्तानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाची उत्सुकता लागून असलेलं गाणं 'पिंगा ग पोरी पिंगा' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

या गाण्याची लिंक बातमीच्या खाली देण्यात आलीय.

याआधी दीपिका आणि प्रियांकाचा या गाण्यातील लूक फोटोमधून जाहीर करण्यात आलाय.  मात्र हे गाणं यू-ट्यूबवर नाही, तर इरॉसने यासाठी आपला स्वत:चा प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

दोघीही मराठमोळ्या अवतारात खूपच सुंदर दिसत आहेत... या फोटोनं 'बाजीराव'ला म्हणजेच रणवीरलाही भूरळ घातलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.