दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Updated: Jul 8, 2015, 06:53 PM IST
दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र title=
छाया - डीएनए

मुंबई : बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

दीपिकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ती एंट्रन्स हॉलमध्ये काही वेळ कोणाची तरी वाट पाहत होती. काही वेळाने तेथे रणवीर सिंग पोहोचला. रणवीरने सुपरमॅनप्रमाणे टी-शर्ट घातला होता. तसेच डोक्याला रुमाल बांधलेला दिसून आला. त्याच्याजवळ काही सामान होते. सुरक्षा रक्षकाकडे सामान तपासणीसाठी देऊन तो आणि दीपिका हॉटेलमध्ये गेलेत. दरम्यान, रणवीर आणि दीपिका गोरेगावच्या फिल्म सिटी स्टुडिओत संजय लीला भन्सालीच्या 'बाजीराव मस्तानी'चे शुटींग करत आहेत.

याआधी रणवीर आणि दीपिका लंडनच्या विमानतळावर एकत्र दिसले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी लंडनमध्ये एक पार्टीही केली. रणवीरने याचे आधीच आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.