बिग बींनी केले असे फोटो शेअर, तुम्हीही कराल आत्मपरिक्षण

बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप अॅक्टीव असणाऱ्या सेलिब्रिटीपैकी एक आहेत. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटाला असे काही फोटो शेअर केले त्याने तुम्हांला आत्मपरिक्षण करणे भाग पडेल. 

Updated: Jul 8, 2015, 06:52 PM IST
बिग बींनी केले असे फोटो शेअर, तुम्हीही कराल आत्मपरिक्षण  title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप अॅक्टीव असणाऱ्या सेलिब्रिटीपैकी एक आहेत. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटाला असे काही फोटो शेअर केले त्याने तुम्हांला आत्मपरिक्षण करणे भाग पडेल. 


 

आज काल आपण मोबाईलमध्ये इतके मग्न असतो की सभोवतालच्या जगात काय सुरू आहे याचे भान नसते. एखादी घटना घडली की त्याचे फोटो काढण्याची सेल्फीश मानसिकता आता आपल्यामध्ये जडू लागली आहे. 


 

दुसरा फोटोत स्वर्गातील दोन वयोवृद्ध माणसं गप्पा मारताना दाखवलं आहे. त्यात म्हटलं आहे की आज काल नव्याने स्वर्गात आलेल्या व्यक्तींना थेट गप्पा मारता येत नाही. 


 

तिसऱ्या फोटोत एक यमदूत माणसाला घेऊन जाण्यास आलेला असताना त्याच्यासोबत सेल्फी काढून तो प्रोफाइल अपडेट करणारा माणूस दाखवला आहे. 


 

चौथ्या फोटोत रस्ता क्रॉस करताना माणसं फोनमध्ये पाहत असून त्यांच्या हातात अंध व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठीच्या काठ्या दिल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.