दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी

दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.

Updated: Dec 27, 2016, 11:29 PM IST
दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी title=

मुंबई : दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.

दुसरीकडे लातूर जिल्हा परीषदने सर्व शाळांना दंगल सिनेमा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याच धर्तीवर राज्यात दंगल प्रत्येक शाळेत दाखवण्यात यावा अशी मागणी, मुलं मुली यांच्यात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी सिनेमा दाखविण्याची मागणी करण्यात आली आहे.