'देऊळ बंद'चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

देऊळ बंद सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालेय. सिनेमाने 4 दिवसांमध्ये 8 कोटींची कमाई केली सिनेमाकडून अजून अपेक्षा निर्मात्यांना आहेत.

Updated: Aug 4, 2015, 08:23 PM IST
'देऊळ बंद'चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

मुंबई : देऊळ बंद सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालेय. सिनेमाने 4 दिवसांमध्ये 8 कोटींची कमाई केली सिनेमाकडून अजून अपेक्षा निर्मात्यांना आहेत.

या सिनेमाचे पहिल्या आठवड्याचे सगळे शो हाऊसफुल असून अपुरे थिएटर मिळण्याचा फटकाही सिनेमाला बसतोय. ब-याच ठिकाणी सिनेमाला पुरेसे थिएटर उपलब्ध नसल्यामुळे रसिकांचीही निराशा होतेय. त्यामुळे जर सिनेमाला अजून चांगले थिएटर उपलब्ध झाले तर हा सिनेमा अजुन कमाईचे रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

सिनेमात गश्मिर महाजनी आणि मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची जुगलबंदी यात दाखवण्यात आलीय. सिनेमातील मोहन जोशींच्या कामाचे सर्वत्र कौतुक होतयं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.