धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा पटानी

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडची भूमिका मॉडेल दिशा पटानी करणार असल्याची बातमी आहे. 

Updated: Jan 5, 2016, 01:34 PM IST
धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा पटानी title=

नवी दिल्ली : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडची भूमिका मॉडेल दिशा पटानी करणार असल्याची बातमी आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा होती. मात्र आता दिशा ही भूमिका कऱणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी टायगर श्रॉफच्या आगामी बागी या चित्रपटात लीड रोल म्हणून दिशाचे नाव चर्चेत होते. मात्र त्यानंतर या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली.

नीरज पांडे दिग्दर्शित धोनी: अनटोल्ड स्टोरीमध्ये सुशांत सिंग राजपूत खुद्द महेंद्र सिंग धोनीची भूमिका बजावतोय. तर धोनीच्या पत्नीच्या भूमिकेत कियारा अडवाणी असणार आहे. अनुपम खेर धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.