FILM REVIEW : तमिळ 'दृष्यम'ची 'बॉलिवूड' कॉपी

दृश्यम

Updated: Jul 31, 2015, 05:16 PM IST
FILM REVIEW : तमिळ 'दृष्यम'ची 'बॉलिवूड' कॉपी title=

चित्रपट : दृश्यम
दिग्दर्शन : निशिकांत कामत
लेखक : उपेंद्र सिधये
संगीत : विशाल भारद्वाज
कलाकार : अजय देवगण, श्रीया सरन, तब्बू, रजत कपूर आणि इतर

मुंबई : अजय देवगण, श्रीया सरन आणि तबु स्टारर 'दृष्यम' मोहनला यांच्या मल्याळम 'दृष्यम'चा हिंदी रीमेक आहे... 

कथानक
ही गोष्ट आहे विजय साळगावकर हा केबल ऑपरेटर आणि त्याच्या परिवाराची... सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस यांच्या आयुष्यात एक ट्वीस्ट येतो. मीरा देशमुख या पोलीस ऑफिसरचा मुलगा गावातून बेपत्ता होतो. या संपूर्ण प्रकरणामुळे विजय साळगावकर आणि त्याच्या परिवारावर संकटाचं वादळ येतं. कारण या पोलीस ऑफिसरचा मुलगा किडनॅप करण्याचा आरोप विजयवर केला जातो. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात एका नवीन संघर्षाला सुरुवात होते. 

तमिळ 'दृष्यम'ची 'बॉलिवूड' कॉपी
दिग्दर्शक निशीकांत कामतनं या मल्याळम 'दृष्यम'ची जवळ जवळ फ्रेम टु फ्रेम अशी मांडणी केली आहे. या दोन्ही सिनेमांची तुलना केली तर नक्कीच मोहनलाल यांचा दृष्यम बॉलिवुडच्या दृष्यमला जोरदार टक्कर देताना दिसतो... पण जर का तुम्ही मूळ 'दृष्यम' पाहिला नसेल तर अजय देवगण स्टारर निशीकांत कामत दिग्दर्शित हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल...

अभिनय
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालंतर तर या सिनेमाच्या मूळ सिनेमात ज्या पद्धतीचा अभिनय मोहनलालनं केला होता, त्या तुलनेत अजय देवगण फिका पडतो... 

'दृष्यम' हा एक गूढपट असल्यामुळे, हा सिनेमा तुम्हाला एका जागी खिळवून ठेवतो एवढं नक्की... इंटरव्हलनंतर  हा सिनेमा एक वेगळंच वळण घेतो,, त्यामुळे तो अधिक रंजक वाटतो...  दृष्यम हा सिनेमा एक फॅमिली एंटरटेनर अशा सिनेमा आहे.. या सिनेमाला आम्ही देतोय ३ स्टार्स... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.