FILM REVIEW : आस्था - अनास्थेचा 'देऊळ बंद'

देऊळ बंद

Updated: Jul 31, 2015, 05:03 PM IST
FILM REVIEW : आस्था - अनास्थेचा 'देऊळ बंद' title=

चित्रपट : देऊळ बंद
दिग्दर्शन : प्रवीण तरडे, प्रणित कुलकर्णी
कलाकार : गश्मीर महाजनी, मोहन जोशी, निवेदिता जोशी, विभावरी देशपांडे, श्वेता शिंदे, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, संदीप पाठक 

 
मुंबई : अभिनेता गश्मिर महाजनी आणि मोहन जोशी स्टारर 'देऊळ बंद'  हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. प्रविण तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ बंद या सिनेमात आस्था आणि अनास्थेची एक कहाणी चित्रीत करण्यात आलीय. 

कथानक
अमेरिकेत सेट असलेला एक भारतीय शास्त्रज्ञ राघव शास्त्री सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रॉजेटसाठी भारतात येतो. याच दरम्यान तो काही अतिरेकींच्याही टार्गेटवर असतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला मुंबईऐवजी पुण्यातल्या एका सामान्य सोसायटीत शिफ्ट करण्यात येतं. याच सोसायटीत स्वामी समर्थांचं एक देऊळ असतं, जिथे रोज आरत्या, भजन अगदी जोरदार चालू असतात. राघव शास्त्री याचा देव धर्मावर अजिबात विश्वास नसतो, तो एक नास्तिक असतो. देऊळात दरदोज चाललेल्या या आवाजामुळे डिस्टर्ब होणारा राघव आपल्या हातात असलेले राजकीय पॉवर वापरुन, हे देऊळ बंद करतो. यानंतर खरं नाट्य घडतं. स्वत: स्वामी प्रकट होतात. मग काय होतं.. याची खरी मजा तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल... 

प्रदर्शनाचं टायमिंग
गुरु पोर्णिमेचं औचित्य साधून हा सिनेमा एकदम करेंट टाईमिंगला प्रदर्शित करण्यात आलाय. अष्टविनायक आणि मुन्नाभाई या सिनेमातले काही एलिमेन्ट्स यात अनुभवायला मिळतील. दिग्दर्शक प्रविण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन योग्य ठरलंय. सिनेमाची मांडणीही उत्तम झालीय.

अभिनय
या सिनेमातचे दोन प्रमुख नट... एकीकडे गश्मिर महाजनी तर दुसरीकडे मोहन जोशी या दोघांनीही जबरदस्त बॅटिंग केलीय. गश्मिर एक न्यू कमर असूनसुद्धा त्याचा अभिनय छान झालाय. मोहन जोशी यांनी साकारलेली स्वामी समर्थांची भूमिकाही व्यक्तिरेखा भाव खावून जाते. त्यांचा अंदाज कमाल आहे, त्यांची डायलॉग डिलिवरीही कमाल आहे. या कॅरेक्टरला थोडासा प्रॅक्टीकल टच देण्यात आलाय ज्यामुळे या दोन्ही भूमिकांमधला संवाद अतिशय रंजक वाटतो. एकीकडे एक शास्त्रज्ञ तर दुसरीकडे स्वताह स्वामी समर्थ यांची केमिस्ट्री चांगलीच रंगलीय.

हा सिनेमा पाहताना तुम्हाला नक्कीच सचिन पिळगावकर यांच्या 'अष्टविनायक' या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या सिनेमात सचिन पिळगावकर यांनी साकारलेली व्यक्तिरेखा गणपतीचं देऊळ तोडतो ज्यामुळे त्याचे वाईट दिवस सुरु होतात किंवा एक वेगळा संघर्ष सुरु होतो. इथेही... देऊळ बंद केल्यानंतर गश्मिरनं साकारलेल्या राघवच्या आय़ुष्यातही काही असेच प्रसंग येतात. याचबरोबर देऊळ बंद या सिनेमात रविंद्र महाजनी, सुनिल बर्वे, सुशांत शेलार, संदीप पाठक, विभावरी देशपांडे, प्रमोद पवार, महेश मांजरेकर अशी कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात पाहुणे कलाकार म्हणुन पहायला मिळतात.

सिनेमाची वाढलेली लांबी
देऊळ बंद या सिनेमाबाबतची एकच गोष्ट खटकते ती म्हणजे या सिनेमाची लांबी.. सिनेमा इंटरवलच्यानंतर जास्त रंजक वाटतो. मोहन जोशी यांची एन्ट्री झाल्यानंतर सिनेमा तुम्हाला होल्ड करण्यात यशस्वी ठरतो. सिनेमाचा पहिला भाग जर आणखी शॉर्ट अॅन्ड स्वीट झाला असता तर कदाचित हा सिनेमा आणखी रंजक ठरला असता... अनेक असे प्रसंग आहेत जे पाहताना उगाचच सिनेमात घुसडण्यात आलेत, असं वाटतं. ज्यामुळे सिनेमा लांबलाय... सिनेमाची लेंथ तीन तास इतकी आहे.

गश्मिर महाजनी याचा गेल्याच आठवड्यात 'कॅरी ऑन मराठी' हा सिनेमा आला होता. हा सिनेमा जरी पडला असलातरी मराठीतला एक रफ एन्ड टफ अभिनेता म्हणून गश्मिरचं स्वागत झालंय हे नक्की...

 देऊळ बंद हा सिनेमा एक फॅमिली एंटरटेनर असून, या सिनमात मोहन जोशी यांचा अभिनय, त्यांचा लूक कमाल वाटतो... सिनेमाचे संवाद आणि स्क्रीनप्ले या सिनेमाची बलस्थानं आहेत. 'देऊळ बंद' हा एक वन टाईम वॉच असा सिनेमा असून या सिनेमाला आम्ही देतोय ३ स्टार्स... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.