अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर

'ऐ दिल है मुश्किल'मुळे वादग्रस्त ठरलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर मिळालीये.

Updated: Nov 4, 2016, 11:08 AM IST
अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर

नवी दिल्ली : 'ऐ दिल है मुश्किल'मुळे वादग्रस्त ठरलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर मिळालीये.

पाकिस्तानचे पूर्व क्रिकेटर इम्रान खान यांनी फवादला तेहरीक-ए-इंसाफ या आपल्या पक्षात येण्यास सुचविले आहे. फवाद याच्या स्टारडम आणि प्रसिद्धीमुळे त्यांच्या पक्षाला राजकारणात फायदा होईल असे इम्रान यांना वाटते. दरम्यान, याबाबत फवाद खानने कोणताही निर्णय़ अद्याप घेतलेला नाही. 

सध्या फवाद खान पाकिस्तानात आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत झालेल्या वादानंतर फवाद पाकिस्तानात परतलाय.