मराठमोळी पल्लवी आता टॉलिवूडमध्ये

 मराठी, हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष आता दक्षिणेतील चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Updated: Nov 4, 2016, 08:23 AM IST
मराठमोळी पल्लवी आता टॉलिवूडमध्ये title=

मुंबई :  मराठी, हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष आता दक्षिणेतील चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

विकी डोनर या हिंदी चित्रपटाच्या साऊथ रिमेकमध्ये पल्लवी प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. तेलुगु भाषेतील हा चित्रपट आहे. ‘नरुडा डोनरुडा’ असे या सिनेमाचे नाव आहे.

पल्लवीने यापूर्वी साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र तेलुगु सिनेमात ती पहिल्यांदा काम करतेय. पल्लवीआधी अनेक मराठी कलाकारांनी साऊथ सिनेमांमध्ये काम केलेय. त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झालाय.

 

1 day to go... #NarudaDONARuda

A photo posted by Pallavi Subhash (@pallavi.subhash) on