धोनीच्या बायोपिकमध्ये होता फवाद खान?

पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होतं आहेत.

Updated: Oct 7, 2016, 11:55 AM IST
धोनीच्या बायोपिकमध्ये होता फवाद खान? title=

मुंबई : पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होतं आहेत. पाकिस्तानी कलाकारांना घेऊ नये असा इशारा मनसेनं दिला आहे. मनसेच्या या इशाऱ्यामुळे ए दिल है मुश्कील आणि रईस या दोन चित्रपटांबाबतचा संभ्रम कायम आहे.

या दोन्ही चित्रपटांबाबत संभ्रम असतानाच धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. धोनीच्या बायोपिकमध्ये पाकिस्तानी कलाकार विराट कोहलीच्या भूमिकेत होता, अशी माहिती समोर येत आहे.

या चित्रपटासाठी फवाद खानचं शूटिंगही झालं होतं. दिग्दर्शक नीरज पांडेला कोहलीच्या भूमिकेत फवाद खानला दाखवून प्रेक्षकांना सरप्राईज द्यायचं होतं. पण कोणताही वाद नको म्हणून फवाद खानचा भाग या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.