कोलकता: कोलकत्यात काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान उपस्थित होता. शाहरूख हा बंगाल टूरिजमचा ब्रॅंड अँबेसेडर देखील आहे. या कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम चर्चेत तेव्हा आला जेव्हा शाहरुखने या कार्यक्रमात मंचावर एक महिला पोलिस काँस्टेबल सोबत डान्स करत असताना तिला उचलून घेतले. एका वर्तमानपत्रात दिलेल्या बातमीनुसार कोलकता पोलिसांच्यां काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहे की कोणताही पोलिस कॉन्सटेबल किंवा अधिकारी ऑन ड्यूटी असताना या प्रकारची कृती कशी करू शकतो?
कोलकत्याचे पोलिस कमिशनर यावर म्हणतात की, 'हा एक सामाजिक कार्यक्रम होता आणि या गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे.'
हा कार्यक्रम कोलकता पोलिसांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात बंगाल टूरिजमचा ब्रॅंड अँबेसेडर म्हणून शाहरुख खान लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.