आमिर आणि शाहरुख खानमध्ये 'वाक्-युद्ध' सुरूच.

 शाहरुखने आमिरच्या न्यूड पोस्टरची खिल्ली उडवली होती. शाहरूखने म्हटल होतं की 'लोकांनी याला टॅलेंट बोलू नये हे काहीतरी आहे पण टॅलेंट नाही आहे. 

Updated: Aug 22, 2014, 05:40 PM IST
आमिर आणि शाहरुख खानमध्ये 'वाक्-युद्ध' सुरूच. title=

मुंबई: शाहरुखने आमिरच्या न्यूड पोस्टरची खिल्ली उडवली होती. शाहरूखने म्हटल होतं की 'लोकांनी याला टॅलेंट बोलू नये हे काहीतरी आहे पण टॅलेंट नाही आहे. 

'पीके'च्या दूसऱ्या पोस्टर लॉन्चच्या कार्यक्रमात आमिरला जेव्हा शाहरुखच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले गेले तेव्हा तो बोला की, "माझ्या मनात यावर भरपूर प्रत्योत्तरं आहेत पण मी ती बोलणार नाही. यावर मी चुप राहनच चांगलं आहे."

पण आमिर काही चुप राहिला नाही तो बोलून पडला की,''तूम्हाला माहीत आहे की जो व्यक्ती दूसऱ्य़ासाठी खड्डा खोदतो त्याचं काय होतं.''

या आधी आपला आगामी चित्रपट 'पीके'च्या पोस्टरमुळे चर्चेत आलेल्या आमिर खानने बॉलिवुडचा सुपरस्टार मित्र सलमान खानला पॅन्ट काढण्याचं आव्हान दिल होतं.
सलमानने आमिरच्या 'धूम-थ्री' या चित्रपटाचं बिग बॉसमध्ये हॅट घालून प्रचार केला होता. आमिर नंतर याच हॅट सोबत या चित्रपटात दिसला होता.

आमिरने म्हटल आहे कि,''सलमानने बिग बॉसमध्ये माझ्यासाठी हॅट घातली होती पण आता 'पीके'साठी तो पॅन्ट काढेल का? त्याने शर्ट उतरवला पण आता तो पॅन्ट काढेल का हे बघुयात. मी सलमानच्या मैत्रीची परीक्षा घ्यायची आहे.''

'पीके'च्या आमिर खानच्या न्‍यूड पोस्‍टरवर खुपच वाद झाला. आता आमिर खानने  'पीके'चा दूसरा पोस्टर लॉन्च केला आहे. यात मात्र विवादा सारखं काही नाही. अमिर म्हणतो की ''या चित्रपटाचे आणखी 10 पोस्टर मी लॉन्च करेल. प्रत्येक पोस्टर एक नवी कथा सागेंल.''

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.