फिल्म रिव्ह्यू: यंग जनरेशनला भावणारी 'कॉफी आणि बरंच काही'!

एक फ्रेश स्टारकास्ट, एक फ्रेश लव्ह स्टोरी असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Updated: Apr 4, 2015, 03:00 PM IST
फिल्म रिव्ह्यू: यंग जनरेशनला भावणारी 'कॉफी आणि बरंच काही'! title=

मुंबई: एक फ्रेश स्टारकास्ट, एक फ्रेश लव्ह स्टोरी असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

कथा
ही कहानी आहे निशाद आणि जाईची... पुण्यात राहणारे हे दोघं... एका कंपनीत एकत्र काम करतात... जाईची भूमिका साकारलीय प्रार्थना बेहरेनं, जाई थोडीशी फिल्मी, रोमॅन्टिक आणि स्वप्नाळू मुलगी असते...  तर दुसरीकडे निशाद तिच्या अगदी विरोधी असतो... हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात खरे, पण एकमेकांवरचं हे प्रेम ते व्यक्त करतात का?.. अभिनेता भूषण प्रधाननं ही यात एक महतत्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.. या दोघंमध्ये तो काय करतो.. त्याची काय भूमिका आहे?.. हा पार्ट खरंतर सिनेमाला एक वेगळा अँगल देणारा ठरतो. जो तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेलच.. तसं पहायला गेलो तर कॉफी आणि बरंच काही या फिल्मला कथा नाहीच.. संपूर्ण सिनेमा एका सिच्युएशनवर आधारीत आहे. 
विरोधी विचार असणारे हे दोघं, जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय घडतं, हे यात दाखवलंय.

दिग्दर्शन :

प्रकाश कुंटे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय... एखाद्या सिच्युएशनवर सिनेमा करणं हे नक्कीच सोपं नाही. प्रकाशनं हे सगळं खूप सहजपणे हाताळलंय. सिनेमाचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे या सिनेमाची स्क्रिप्ट आणि यातले संवाद. विशेष करुन संवाद खरंच खूप यूथफुल आणि आजच्या जनरेशनचे वाटतात. एक वेगळा प्रयोग या निमित्तानं होतांना दिसतोय. याचबरोबर सिनेमाची आणकी एक खासियत म्हणजे कॉफी आणि बरेच काही या सिनेमाची सिनेमाटोग्राफी खूप क्रिएटिव्ह पद्धतीनं सिनेमाटोफ्राफर अर्जुन सोरटे यांनी हाताळलीय.

एक  य़ूथफुल सिनेमा असल्यामूळे सिनेमाच्या स्टारकास्टचीही अगदी योग्य पद्धतीनं निवड झाली आहे. प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन या चौघांनीही चांगला परफॉर्मन्स दिलाय.

'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा आजच्या जनरेशनला आवडण्याची शक्यता जास्तआहे. या सिनेमाला आम्ही देतोय तीन स्टार्स.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.