...जेव्हा अक्षय कुमार रांगेत उभा राहतो

सेलिब्रिटिज असो किंवा राजकारणी यामंडळीना अनेक ठिकाणी  व्हीआयपी ट्रिटमेन्ट दिली जाते, अथवा ती मिळावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र याच व्हीआयपी कल्चरला बाजूला केलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने. 

Updated: Apr 4, 2015, 12:54 PM IST
...जेव्हा अक्षय कुमार रांगेत उभा राहतो title=

मुंबई : सेलिब्रिटिज असो किंवा राजकारणी यामंडळीना अनेक ठिकाणी  व्हीआयपी ट्रिटमेन्ट दिली जाते, अथवा ती मिळावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र याच व्हीआयपी कल्चरला बाजूला केलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने. 

अक्षय कुमारने नुकतेच त्याची मुलगी नितारा हिची अॅडमिशन प्लेस्कूलमध्ये केलीय. सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार सेलिब्रिटी असून सुद्धा मुलीच्या अॅडमिशनसाठी रांगेत उभा होता. शाळा प्रशासनाने रांगेत उभे न राहता मुलीचं अॅडमिशन करण्याची विनंती अक्षयला केली होती. मात्र ती विनंती विनम्रपणे नाकारत रांगेत उभे राहून आपल्या मुलीची अॅडमिशन त्यानी केली. यावेळी अक्षयची पत्नी ट्विंकल सुद्धा तिथं उपस्थित होती. 

मी माझ्या मुलीला नेहमीच सर्वसामान्य मुलींप्रमाने वागवतो. त्यामुळे तिची अॅडमिशन करतांना मी सर्वसामान्य पालकांसारखा वागलो. तसंच शाळेचे नियम पाळणं हेही माझं कर्तव्य होतं आणि त्यात काही गैर नाही, असंही अक्षय कुमारनं सांगितलं. 

व्हीआयपी कल्चरचा सर्वसामान्यांना नेहमीच त्रास होत असतो. त्यामुळं अक्षयनं त्याच्या वागण्यातून एक सामाजिक संदेशच दिला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.