फिल्म रिव्ह्यू: 'किस किस को प्यार करू' पेक्षा कॉमेडी नाइट्सचं पाहा

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या प्रचंड यशानंतर कपिल शर्माचा पहिला चित्रपट 'किस किस को प्यार करू' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कपिल शर्मा सोबत चार अभिनेत्रीही आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 24, 2015, 09:31 PM IST
फिल्म रिव्ह्यू: 'किस किस को प्यार करू' पेक्षा कॉमेडी नाइट्सचं पाहा

मुंबई: 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या प्रचंड यशानंतर कपिल शर्माचा पहिला चित्रपट 'किस किस को प्यार करू' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कपिल शर्मा सोबत चार अभिनेत्रीही आहेत.

दिग्दर्शक - अब्बास -मस्तान 
कलाकार - कपिल शर्मा, वरुण शर्मा, अरबाज खान, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, मंजरी फड़नीस, अमृता पूरी, साईं लोकर, सुप्रिया पाठक 
वेळ: 136 मिनट 
सर्टिफिकेट: U/A 
रेटिंग: 2.5 स्टार

'खिलाडी', 'हमराज', 'ऐतराज', 'अजनबी' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी आपल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांशिवाय शाहरुखचा 'बादशाह' हा विनोदी चित्रपटही बनवला होता. आता अब्बास-मस्तान कॉमेडी किंग कपिल शर्माला घेऊन 'किस किस को प्यार करू' हा चित्रपट घेऊन आले आहेत. जाणून घ्या कसा आहे चित्रपट...

कथानक

चित्रपटात कुमार शिव राम किशन (कपिल शर्मा)नं 3-3 लग्न केलेत आणि त्याच्या तिन्ही बायका आहेत जूही (मंजिरी फडणीस), सिमरन (सिमरन कौर मुंडी) आणि अंजली (साईं लोकर)... या तिघी एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात. तिन्ही पत्नींना माहित नाहीय की, शिव, राम आणि किशन 3 वेगवेगळे लोकं नाही तर एकच व्यक्ती आहे. त्याची एक गर्लफ्रेंड पण आहे दीपिका (एली अवराम). मग कथानकात विविध ट्विस्ट आणि वळणं येतात. या सर्व प्रकरणात कुमारला त्याचा मित्र सोबत करतो आणि शेवटी एक निष्कर्ष काढला जातो.. हा निष्कर्ष काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

स्क्रिप्ट

चित्रपटाची कथा आपल्याला 90च्या दशकातील वाटते. तुम्हाला 'साजन चले ससुराल' हा गोविंदाचा चित्रपट आठवत असेल तर त्याचंच हे नवं व्हर्जन म्हणता येईल. काहीही करून प्रेक्षकांना हसवायचं हाच चित्रपटाचा उद्देश दिसतो. यातील काही डायलॉग्ज ऐकून आपल्याला कपिलच्या कॉमेडी नाइट्स शोची आठवण होईल. खूप साधारण आणि काल्पनिक ही कथा आहे. चित्रपट मनोरंजक बनविण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण स्क्रिप्ट अधिक चांगली बनवता आली असती. एखाद्या कॉमेडी शो पेक्षा हा चित्रपट मग चित्रपट वाटला असता.

अभिनय

पहिला चित्रपट म्हणून कपिल शर्माचा अभिनय चांगला म्हणू शकतो. कधी-कधी यात 'कॉमेडी नाइट्स' सारखं वातावरण तयार होतं. आपआपल्या रोल प्रमाणे सिमरन, साईं, मंजिरी आणि अरबाज खाननंही चांगलं काम केलंय. वरुण शर्मा आणि जॉनी लिव्हर जेव्हा स्क्रीनवर येतात, तेव्हा हास्याचे फवारे उडतात.

संगीत
चित्रपटाचं संगीत ओके-ओके आहे. या गाण्यांच्या काळात आपण ब्रेक घेऊन पॉपकॉर्न आणायला किंवा टाइम पास करायला जावू शकता. गाणे कमी असते तर कदाचित कथानक अधिक चांगलं वाटलं असतं.

चित्रपटाची कमकुवत बाजू
चित्रपटाची स्क्रिप्टच त्याची कमकुवत बाजू आहे. 2015मध्ये जर आपल्याला 90च्या दशकातील टिपिकल कथा मिळाली तर ती पचणारच नाही.

चित्रपट का पाहावा
जर आपण कपिल शर्मा आणि त्यातील हिरोईन्सचे फॅन असाल तर चित्रपट पाहावा... 

का पाहू नये
जर आपल्याला आपले पैसे आणि वेळ वाया घालवायचा नसेल तर हा चित्रपट पाहू नका... त्यापेक्षा कपिलचा 'कॉमेडी नाइट्स' हा शो आपलं जास्त मनोरंजन करेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.