फिल्म रिव्ह्यू : लोकं स्वीकारतील का या भाबड्या स्वामीला..

स्वामी 

Updated: Nov 29, 2014, 11:01 AM IST
फिल्म रिव्ह्यू : लोकं स्वीकारतील का या भाबड्या स्वामीला.. title=

सिनेमा : स्वामी 
संगीत : उत्तम सिंग , पंडित अजय चक्रवर्ती , सुखविंदर सिंग 
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कलाकार :चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संस्कृती खेर,  विक्रम गोखले, दिवंगत विनय आपटे

कथा
पूनम शेंडे निर्मित स्वामी पब्लिक लिमिटेड या सिनेमाची संकल्पना विजय मुंडे यांची आहे..या संकल्पनेला कथा..पटकथेच्या आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय तो गजेंद्र अहिरेने...सिनेमाचं कथानक सांगायचं झालं तर..सिध्दार्थ हा गावाकडचा अत्यंत साध्या राहणीमानातला...साधासुधा मुलगा.... आजीच्या सोबतीने लहानाचा मोठा झालेला ...एमएसडब्लू करून समाजसेवा करणारा असा हा सिध्दार्थ...ज्याच्या आयुष्यात सायली येते...आणि त्याच सायलीच्या माध्यमातून अफाट बुध्दीमत्ता असलेल्या बिझनेसमन नचीकेतशी त्याची ओळख होते आणि सिध्दार्थचं आयुष्यच बदलून जातं...भरमसाट पैसा मिळवण्याच्या आशेने सिध्दार्थ स्वत:ची मूल्य विसरतो.....लोकांच्या भाबड्या श्रध्देचा योग्य वापर करत सिध्दार्थच्या सहाय्याने आणि सायलीच्या मेहनतीने नचिकेत एक प्लॅन आखतो आणि सिध्दार्थला..सिध्दार्थ महाराज अर्थात स्वामी असा ब्रॅण्ड बनवून...सुरु होतो तो  स्वामी पब्लिक लिमिटेड कंपनीचा खेळ....आता हा सिध्दार्थचा स्वामी कसा होतो...हा स्वामी लोकांचा विश्वास मिळवतो का...यासाठी नचिकेत कसा प्लॅन तयार करतो...आणि शेवटी या स्वामी पब्लिक लिमिटेडचं काय होतं..... हे सगळ उलगडताना सिनेमा रंजक होत जातो... 

अभिनय...................................

सिनेमाचा आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे यात असलेली स्टारकास्ट...स्वामी या मुख्य भूमिकेत असलेल्या चिन्मय मांडलेकरने आपली भूमिका चोख बजावली आहे...कायमच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा हाताळणारा चिन्मय स्वामीच्या भूमिकेत अगदी परफेक्ट  वाटतो...आधीचा सिध्दार्थ आणि स्वामी या दोन व्यक्तिरेखा सादर करतानाचा वेगळेपणा तो उत्कृष्टरित्या आपल्या अभिनयातून सादर करतो...याच सिनेमातली दुसरी महत्वाची भूमिका म्हणजे नचिकेत अर्थात सुबोध भावे... एखाद्या गोष्टीत बिझनेस माइंडेड राहुन आपला बिझनेस सक्सेसफुल बनवणारा बिझनेसमन, सुबोधने अगदी फंटास्टिक साकारला आहे..याधीही सुबोधने बिझनेसमनची भूमिका पडद्यावर साकारली आहे...त्यामुळे त्याच्या भूमिकेत नाविन्य असं वाटत नसलं तरीही आपली डायलॉगबाजी, अभिनय या बाबतीत सुबोधने 100 % देण्याचा प्रयत्न केलाय...नवोदीत अशी संस्कृती खेर हिने सायलीची साकारलेली भूमिकाही चांगली रेखाटलीय..नवोदीत असल्याचं तिच्या अभिनयावरून तरी वाटत नाही...त्याचबरोबर सिनेमात विक्रम गोखले...नीना कुलकर्णी....दिवंगत विनय आपटे यांनी साकारलेल्या भूमिका सिनेमाला आणखीनच उठावदार बनवतात...

 
दिग्दर्शन.............

 सिनेमाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं तर गजेंद्र अहिरेचा टच असलेला असा हा सिनेमा आपल्याला जाणवतोच...तशी कथा ही सर्वसामान्याना माहिती असलेलीच आहे, मात्र तरीही शेवटपर्यंत सिनेमात काय होतं? हे राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो..सिनेमातली प्रत्येक फ्रेम...कॅमेराचा अँगल हा अतिशय उत्कृष्टरित्या घेतलेला आहे...सिनेमात एखाद दुसरा सीन खटकतोही...इतकंच नाही तर काही काळ सिनेमा बघताना थोडंसं बोरही होतं...

 

संगीत....................................

सिनेमात बॅकराऊंड म्युझिकबरोबरच फारफारतर दोनच गाणी आहेत...कथानकाच्या ओघात सहज येणार असं हे संगीत आहे... यातल्या गाण्यांना संगीतबध्द केलंय ते दिल तो पागल है सिनेमाला संगीत देणारे संगीतकार उत्तम सिंग यांनी...पंडित अजय चक्रवर्ती आणि सुखविंदर सिंग यांनी या सिनेमातली गाणी गायली आहेत...त्यामुळे कुठेतरी सिनेमाच्या कथानकाला साजेसं संगीत आपलं मन जिंकून जातं..

 
स्पेशल अपिअरन्स... 

एकुणच एक उत्तम कथा...चोख अभिनय...संगीताची जमेची बाजू... आणि दिग्दर्शनातही तरबेज असा हा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही...इतकंच नाही तर उत्कृष्ट निसर्गरम्य अशा ठिकाणी सिनेमॅटोग्राफर विक्रम अलमादी यांनी केलेलं चित्रण सिनेमाला आणखीनच उठावदार बनवतात...त्यामुळे मी या सिनेमाला देतेय साडेतीन स्टार्स.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.