‘एफआयआर’फेम कविताला ऑनलाइन गंडा

एफआयआर या मालिकेत गाजलेली कलाकार कविता कौशिकला खऱ्या आयुष्यात चोरांनी ऑनलाइन पध्दतीनं हजारोंचा गंडा घातलाय. याप्रकरणी तिनं बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

Updated: Sep 22, 2014, 01:06 PM IST
‘एफआयआर’फेम कविताला ऑनलाइन गंडा title=

मुंबई: एफआयआर या मालिकेत गाजलेली कलाकार कविता कौशिकला खऱ्या आयुष्यात चोरांनी ऑनलाइन पध्दतीनं हजारोंचा गंडा घातलाय. याप्रकरणी तिनं बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

मालाड इथं कविता राहते. भामट्यांनी बनावट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिच्या खात्यातील ८९ हजार ६८८ रुपयांची ऑनलाइन खरेदी केली. तपासात ही चोरी लंडन इथून झाल्याचं उघड झालंय.

१० सप्टेंबरला तिला लागोपाठ दहा वेळा खात्यातून पैसे काढल्याचा संदेश आला. कवितानं याबाबत बँकेकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. तिनं तत्काळ डेबिट कार्ड ब्लॉग केलंय. पण अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसतेय. त्यामुळं ऑनलाइन बँकिंगची सेवा घेतांना सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.