स्वप्निल जोशीच्या मुलीचा फोटो व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशीच्या मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. स्वप्नीलची पत्नी लीना हिने 23 मे 2016 रोजी मुलीला जन्म दिला. तिचे नाव मायरा ठेवण्यात आल्याचेही कळते. स्वप्निल जोशी फॅन क्लबने मायराचा पहिलावहिला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'लेडीज अँड जेन्टमन प्लीज वेलकम मायरा स्वप्निल जोशी' अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. 

Updated: Jul 11, 2016, 04:39 PM IST
स्वप्निल जोशीच्या मुलीचा फोटो व्हायरल title=
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशीच्या मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. स्वप्नीलची पत्नी लीना हिने 23 मे 2016 रोजी मुलीला जन्म दिला. तिचे नाव मायरा ठेवण्यात आल्याचेही कळते. स्वप्निल जोशी फॅन क्लबने मायराचा पहिलावहिला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'लेडीज अँड जेन्टमन प्लीज वेलकम मायरा स्वप्निल जोशी' अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. 
 
पत्नी लीना आणि मुलगी मायरासोबत वेळ घालवण्यासाठी स्वप्निलने कामातून थोडा ब्रेक घेतला आहे. पण लवकरच आगामी 'फुगे' या चित्रपटातून स्वप्निल पुनरागमन करेल. ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीचीही भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे.