'फितूर'ला मागे टाकत हॉलिवूडनं केलीय बॉलिवूडवर मात!

फितूर, सनम रे हे हिंदी तर पोश्टर गर्ल हा मराठी सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला... बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणता सिनेमा सर्वात जास्त गल्ला गोळा करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं... पण, या सगळ्या सिनेमांना मागे टाकत 'डेडपूल' हा इंग्रजी सिनेमा बॉक्स ऑफिसवरचा 'हिरो' ठरलाय. 

Updated: Feb 12, 2016, 10:19 PM IST
'फितूर'ला मागे टाकत हॉलिवूडनं केलीय बॉलिवूडवर मात! title=

मुंबई : फितूर, सनम रे हे हिंदी तर पोश्टर गर्ल हा मराठी सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला... बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणता सिनेमा सर्वात जास्त गल्ला गोळा करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं... पण, या सगळ्या सिनेमांना मागे टाकत 'डेडपूल' हा इंग्रजी सिनेमा बॉक्स ऑफिसवरचा 'हिरो' ठरलाय. 

तब्बू, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी कास्ट असलेला 'फितूर' या आठवड्यात भाव खावून जाईल, असं सगळ्यांना वाटत असतानाच 'डेडपूल'नं बाजी मारलेली बॉक्स ऑफिसवर दिसली. 

रिजनल सिनेमा बाजुला ठेवला तर फितूर आणि सनम रे या दोन्ही हिंदी सिनेमांसाठी हा दिवस फारसा चांगला ठरला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सनम रे बनवण्यासाठी १५ करोडोंचा खर्च झालाय... तर फितूरसाठी जवळपास ७० करोड रुपये खर्च करण्यात आलेत.

आज सनम रे हा सिनेमा तब्बल २००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला तर फितूर हा १५०० स्क्रिन्सवर झळकला. पण, प्रेक्षकांना मात्र या सिनेमांकडे पाठ फिरवलेली दिसली. याच निमित्तानं हॉलिवूडनं बॉलिवूडवर केलेली मातही पाहायला मिळाली.