'गंगनम' फेम पीएसवायच्या गाडीला अपघात

'गंगनम स्टाईल' गाणं आणि डान्सनं सगळ्या जगालाच आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या पॉप स्टार पीएसवायच्या गाडीचा अपघात झालाय. 

Updated: Jul 17, 2015, 10:53 PM IST
'गंगनम' फेम पीएसवायच्या गाडीला अपघात  title=

बिजिंग : 'गंगनम स्टाईल' गाणं आणि डान्सनं सगळ्या जगालाच आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या पॉप स्टार पीएसवायच्या गाडीचा अपघात झालाय. 

'चायना डेली'नं दिलेल्या माहितीनुसार, पीएसवाय १६ जुलै रोजी आपल्या लाल रंगाच्या रोल्स रॉयस गाडीनं हांग्जो स्थित हॉटेलमध्ये जात असताना हा अपघात झाला. पीएसवायची गाडी समोरून येणाऱ्या बसला धडकली. 

सुदैव म्हणजे या अपघातात पीएसवायला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर पीएसवायला दुसऱ्या गाडीतून इच्छित स्थळी रवाना करण्यात आलं.

पीएसवायनं २०१२ साली आपल्या गंगनम स्टाईलनं फारच कमी वेळात मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्याच्या व्हिडिओनं यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा इतिहासच रचला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.