गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूम

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चनने लावली हजेरी. झी टॉकीच्या चार सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. विभिन्न भाषा आणि संस्कृतीचे लोक सिनेमांमुळे एकत्र येतात. मानवी एकत्रिकरणाचे सिनेमा हे मोठे साधन आहे. हा वारसा सिने उद्योगातील लोकांनी असाच पुढे चालवावा, असे आवाहन 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी केले. 

Updated: Nov 21, 2014, 03:17 PM IST
गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूम title=

पणजी : गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चनने लावली हजेरी. झी टॉकीच्या चार सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. विभिन्न भाषा आणि संस्कृतीचे लोक सिनेमांमुळे एकत्र येतात. मानवी एकत्रिकरणाचे सिनेमा हे मोठे साधन आहे. हा वारसा सिने उद्योगातील लोकांनी असाच पुढे चालवावा, असे आवाहन 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी केले. 

गोव्यात  इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. ओपनिंगसाठी खास सुपरस्टार रजनीकांत आणि शहेनशाह अमिताभ बच्चनने आपली हजेरी लावली. ३० नोव्हेंबर पर्यंत हा ४५ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात रंगणार आहे.

यंदाच्या या महोत्सवात अठरा विभागात तब्बल ३१० दजर्जेदार सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. तसंचं या महोत्सवात ऑस्कर मानांकनाच्या २८ फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. अनेक सेलिब्रिटीही या महोत्सवाला हजर राहणार आहेत.

झी टॉकीजच्या चार सिनेमांचं स्क्रीनिंगही यावेळी होणार आहेत. इफ्फी फेस्टिव्हल यापुढे कायमस्वरुपी गोव्यातच होणार असल्याची घोषणा केल्याबद्दल बिग बी अमिताभ यांनी आनंद व्यक्त केलाय. तर सुपरस्टार रजनीकांत यांना यावेळी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

इफ्फीचा उद्घाटन सोहळा चांगलाच रंगला. मात्र त्यानंतरही रंगारंग परफॉर्मन्सची चांगलीच बरसात झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.