'देसी गर्ल' प्रियांकाला 'झॉम्बी' व्हायचंय...

हे ऐकून नवलच वाटेल परंतू बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची झॉम्बी बनण्याची इच्छा आहे. प्रियंकाने ही आपली अनोखी इच्छा सोशल वेबसाईट ट्विटरवर व्यक्त केलीय. 

Updated: Nov 20, 2014, 09:56 PM IST
'देसी गर्ल' प्रियांकाला 'झॉम्बी'  व्हायचंय...  title=

मुंबई : हे ऐकून नवलच वाटेल परंतू बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची झॉम्बी बनण्याची इच्छा आहे. प्रियंकाने ही आपली अनोखी इच्छा सोशल वेबसाईट ट्विटरवर व्यक्त केलीय. 

'मला झॉम्बी बनायचंय... जेव्हा कशाचीही जाणीव होत नाही तेव्हा आयुष्य खूपच सोप्पं होऊन जातं... झॉम्बींच्या दुनियेत हे असच सगळं बघायला मिळतं' असं प्रियांकानं  ट्विटरवर म्हटलंय. आता, प्रियांकाच्या या उद्विग्न परिस्थितीमागे कारण काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. 

 
प्रियंका या बिझी आहे ती संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या शुटींगमध्ये... या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंगदेखील आहे...  प्रियांका कदाचित तिच्या बिझी शेड्युलला कंटाळल्यासारखी दिसतेय... कारण, अशाच अर्थाचं आणखी एक ट्विट तिनं केलंय.  ‘मेकअप चेक करा, केस चेक करा, ड्रेस चेक करा, लाइन चेक करा ,डोकं फिरलंय....!'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.