'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत

  गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय. 

Updated: May 11, 2016, 10:25 PM IST
'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत

मुंबई : नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा प्रदर्शित झाला आणि संपूर्ण तरुणाई या सिनेमाच्या प्रेमात पडली. सिनेमाची हिरोईन आर्चीची क्रेज जास्त दिसत असली तरी परशा अर्थात आकाश ठोसरने तिच्यावर मात केलेय. गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय. 

गूगलवर सर्वाधिक सर्च

सैराटमधील आर्ची आणि परशाची पडद्यावरील प्रेम कहाणी सर्वांनाच भावलेय. या सिनेमाला सगळ्यांनीच डोक्यावर घेतले. चित्रपटगृहाच्या खिडकीवर हाऊस फुल्लचा बोर्ड झळकला. मराठी सिनेमा सृष्टीत ११ दिवसात ४१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. आज आर्ची आणि परशाचा बोलबाला आहे. आता तर आकाश ठोसर गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्यामुळे त्याचे विकिपिडिया पेजही तयार करण्यात आलेय.

आकाशची ओळख

आकाश मूळचा पुण्याच्या औंध येथील राहणारा आहे. त्याने औंधमधील एसएसव्हीएम शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेय. त्यानंतर त्याने पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. आकाशची जन्मतारीख २४ फेब्रुवारी १९९३ असून तो आता २३ वर्षांचा आहे.

 

आकाशला कोण आवडते?

दरम्यान, आकाशने शिक्षण पूर्ण करत असताना काही नाटकांमध्येही भाग घेतला होता. त्याला नाना पाटेकर आणि अंकुश चौधरी हे अभिनेते आवडतात. त्यामुळे या कलाकारांना भेटण्याचीही त्याची फार इच्छा आहे.