'जज'च्या भूमिकेत गोंविदा

बरेच दिवस छोट्या पडद्यापासून दूर असलेला बॉलिवुडमधील स्टार गोविंदा छोट्या पडद्यावर पुन्हा एंन्ट्री करणार आहे. 'डीआईडी सुपर मॉम्स' या डान्स का्र्यक्रमामधून जजच्या भूमिकेत गोंविदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Updated: Mar 18, 2015, 05:23 PM IST
'जज'च्या भूमिकेत गोंविदा title=

नवी दिल्ली : बरेच दिवस छोट्या पडद्यापासून दूर असलेला बॉलिवुडमधील स्टार गोविंदा छोट्या पडद्यावर पुन्हा एंन्ट्री करणार आहे. 'डीआईडी सुपर मॉम्स' या डान्स का्र्यक्रमामधून जजच्या भूमिकेत गोंविदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकताच दिल्लीमध्ये या का्र्यक्रमाचा लॉंचिंग सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी बोलतांना गोंविदा म्हणाला की "चांगल्या गोष्टी करण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. पण मी अशा कार्यक्रमाला हा बोलायचं ठरवलं होत ज्यामधून मी प्रेक्षकांना काही देऊ शकतो."

यापूर्वी गोंविदा  'जीतो छप्पर फाड़ के' या कार्यक्रमात निवेदकाच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसला होता. 'डीआईडी सुपर मॉम्स' कार्यक्रमात गोंविदासोबत गीता कपूर आणि टेरेंन्स लुईस असणार आहेत.

माझ्या यशात माझ्या आईचा मोठा वाटा आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचं कारणही माझी आई असल्याचं गोंविदाने सांगितले. माझ्या यशात माझ्या आईचा मोठा वाटा आहे.