'गजवदना' सोशल मीडियात चर्चेत

व्हिडीओ सोशल मीडियावर गजन वदना हे गीत लोकप्रिय होतंय, या गाण्यासाठी मराठीतील ९० गायकांनी आवाज दिला आहे.

Updated: Aug 22, 2016, 11:21 AM IST

मुंबई : व्हिडीओ सोशल मीडियावर गजन वदना हे गीत लोकप्रिय होतंय, या गाण्यासाठी मराठीतील ९० गायकांनी आवाज दिला आहे. या गाण्यामध्ये गणेश स्तवन तसेच गणपतीच्या आरतीचाही समावेश आहे. 

गजन वदना या गाण्याला सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे, संगीत क्षेत्रातील नामांकितांनीही या गाण्यासाठी विविध वाद्यांवर साथ दिली आहे.

'गजन वदना'त यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत आदींसह दिग्गज गायकांनी हे गाणे गायले आहे.