सैराट सिनेमात 'सल्या'ला कशी मिळाली संधी

महाराष्ट्रात सध्या सैराटचं वादळ आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र हे लोकांना खूपच आवडलंय. असंच एक पात्र म्हणजे परश्याचा मित्र सल्या. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख याने देखील सिनेमात खूप उत्तम कामगिरी केली आहे.

Updated: May 10, 2016, 03:43 PM IST
सैराट सिनेमात 'सल्या'ला कशी मिळाली संधी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सैराटचं वादळ आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र हे लोकांना खूपच आवडलंय. असंच एक पात्र म्हणजे परश्याचा मित्र सल्या. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख याने देखील सिनेमात खूप उत्तम कामगिरी केली आहे.

अरबाज शेख हा जेऊरला नागराज मंजुळे यांच्या घराशेजारीच राहतो. त्यालाही अभिनयाची आवड होती. त्याच्या मावस भावाने म्हणजेच सोहेल शेखने फँड्री या सिनेमामध्ये देखील काम केलं आहे. फँड्रीमध्ये संग्रामची भूमिका करणार हाच तो सोहेल शेख.

सैराटमध्ये अभिनयासाठी अरबाज हा भूषण मंजूळेंच्या सतत मागे लागला होता. त्यानंतर त्याचं सल्या या पात्रासाठी ऑडिशन झालं त्याचा व्हिडिओ नागराज मंजुळेंना पाठवण्यात आला. नागराज मंजुळेंना पहिल्यांदा अरबाजमधल्या सल्याची अॅक्टिंग एवढी पसंत पडली नाही. ही गोष्ट त्याला रात्री ११ वाजता व्हॉट्सअॅपवर कळाली. यामुळे तो नाराज झाला आणि रात्री १ वाजेपर्यंत रडत बसला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने ऑडिशन घेण्यात आलं आणि यावेळी मात्र अरबाजचं सल्या या पात्रासाठी निवड झाली. अशी माहिती फेसबूकवर व्हायरल होत आहे.