करणजीत कौर अशी बनली सनी लिओन...

२०१२ मध्ये आलेल्या 'जिस्म २' आणि बिग बॉसमधून भारतीयांना ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे सनी लिओन... पण, सनीचं हे खरं नाव नाही... तिचं खरं नाव आहे करणजीत कौर वोहरा.

Updated: Jan 16, 2016, 04:11 PM IST
करणजीत कौर अशी बनली सनी लिओन... title=

नवी दिल्ली : २०१२ मध्ये आलेल्या 'जिस्म २' आणि बिग बॉसमधून भारतीयांना ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे सनी लिओन... पण, सनीचं हे खरं नाव नाही... तिचं खरं नाव आहे करणजीत कौर वोहरा.

मूळ भारतीय कुटुंबात कॅनाडामध्ये सनी लिओनचा जन्म झाला होता. परंतु, जेव्हा तिनं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिचं हे नाव या इंडस्ट्रीसाठी 'फिट' नव्हतं. मार्च २००१ साली १९ वर्षीय करणजीतला 'पेंटहाऊस पेट' म्हणून निवडण्यात आलं होतं. मेन्स मॅगझीनसाठी तिच्या देहाचं प्रदर्शन भरणार होतं. 

एका मॅगझीनला इंटरव्ह्यू देताना सनीनं म्हटलंय... 'मी तेव्हा केवळ १९ वर्षांची होते. पेंटहाऊस पेट म्हणून निवड झाल्यानंतर जगभरातील रेडिओ कार्यक्रम, टीव्हा आणि मॅगझीन शूटसाठी तुम्हाला पाठवलं जातं... हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं. तेव्हा एका मॅगझीनला मुलाखत देताना त्यांनी विचारलं की तुला तुझं नाव काय ठेवायचंय? तेव्हा, सहजच मी 'सनी' हे नाव कसं वाटेल? शेवटचं नाव काहीही ठेवा... असं त्यांना म्हटलं... खरं म्हणजे, सनी तर माझा भाऊ संदीप याचं टोपणनाव होतं'.

आणि झालं... हेच नाव पुढे सनीची ओळख बनलं. सनीचा 'मस्तीजादे' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.