मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनचा पत्नी सुझान खान सोबत 2014मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ऋतिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातंय. ऋतिक आणि कंगणा राणावतच्या अफेअरचीही चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागलीय.
भूषण कुमार यांचं नवं गाणं 'धीरे धीरे से'च्या लाँचिंगला जेव्हा ऋतिकला हे विचारलं गेलं की, हे सुंदर गाणं आपण कुणाला डेडिकेट करू इच्छिता तर ऋतिकनं सांगितलं, 'माझ्या आयुष्यात अद्याप असं कुणी नाही की ज्याला हे गाणं डेडिकेट करू, जेव्हा कधी असं काही होईल मी आपल्याला नक्की सांगेन.'
आणखी वाचा - हृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज
सध्या ऋतिकनं आपण सिंगल असल्याचं कन्फर्म सांगितलंय. सोबतच अभिनेत्री कंगणा राणावतसोबत आपल्या अफेअरच्या प्रश्नावर ऋतिकनं आश्चर्य व्यक्त केलं. यापूर्वी ऋतिक काही म्हणेल त्याची को-स्टार सोनम कपूरनं म्हटलं, 'ऋतिकनं आताच सांगितलं की तो सिंगल आहे.'
बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा असं काही नवीन नाही. मात्र ही बातमी ऐकून ऋतिक आणि कंगणाचे फॅन्स मात्र नाराज झाले असतील.
आणखी वाचा - अनुराग कश्यप, राधिका आणि 'द डे ऑफ्टर इव्हरी डे
'धीरे धीरे से' गाणं 1990मधील आशिकी चित्रपटातील गाणं 'धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना' या गाण्याचं रिमेक आहे. ऋतिक रोशन आणि सोनम कपूरवर हे गाणं चित्रित केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.