सलमान खानच्या वाढदिवसाला एवढा महाग केक

 अभिनेता सलमान खानने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सलमानच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी, त्याच्या जवळच्या लोकांनी खास तयारी केली.

Updated: Dec 29, 2015, 04:16 PM IST
सलमान खानच्या वाढदिवसाला एवढा महाग केक title=

मुंबई :  अभिनेता सलमान खानने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सलमानच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी, त्याच्या जवळच्या लोकांनी खास तयारी केली.

सलमानची बहिण अर्पिताने सलमानच्या वाढदिवसासाठी एक विशेष केक आणला होता. हा केक या वाढदिवसासाठी एक विशेष आकर्षण होता.

खान परिवाराने सलमानचा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये साजरा केला.

सलमान खानच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी बहिण अर्पिताने ५० किलोचा केक आणला होता. जुहूतील मिश मॅश बेकरीतून हा केक आणला होता, पुजा आणि शिखाने हा केक बनवला होता. या केकची किंमत होती रूपये १ लाख.